चिपळूण : जुवाड बेटावरील महिला शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वितरण

चिपळूण : शहरातील जुवाड बेटावरील ‘सावित्रीबाई आणि सावतामाळी शेतकरी स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिशान्तर संस्थेच्यावतीने अन्नपूर्णा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कन्साई नेरोलॅक पेंट्स लि. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्तातून महिला शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वितरण नुकतेच करण्यात आले. कंसाई नेरोलॅक व दिशान्तरच्या संयुक्त उपक्रमामुळे आमच्या श्रमाला सन्मान मिळत असल्याचे मत यावेळी शेतकरी महिलांनी व्यक्त केले.

यावेळी कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख, फॅक्टरी व्यवस्थापक जयवर्धन, लोटे प्लान्टचे मनुष्यबळ व्यवस्थापक नंदन सुर्वे तसेच दिशान्तर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संतोष देशमुख यांनी जुवाड बेटावर राबविण्यात येत असलेल्या अन्नपूर्णा प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच येथील महिला शेतकऱ्यांनी सुयोग्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य आत्मसात करून व्यक्तीविकासही साधला असल्याचे नमूद केले. यापुढील वाटचालीतही कंपनी महिला शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन नंदन सुर्वे यांनी दिले.

यावेळी महिला शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सीमा यादव यांनी तर खजिनदार शर्वरी कुडाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 18/Dec/2024