R Ashwin : ब्रेकिंग! रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात टीम इंडियासमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात कोणतेही नुकसान न करता 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस पडला आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. दरम्यान, अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विनने ही घोषणा केली. अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली.

38 वर्षीय अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं टीम इंडियासाठी 37 वेळा एका डावात सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच, त्यानं सर्वाधिक प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड (11 वेळा) आपल्या नावे केले आहेत. यामध्ये अश्विननं मुरलीधरनची बरोबरी केली आहे. फिरकीपटू म्हणून त्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट 50.7 (200+ विकेट) आहे, जो आजवरचा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे.

अश्विनची कसोटीतील शतकं

103 रन विरुद्ध वेस्टइंडीज, मुंबई, 2011
124 रन विरुद्ध वेस्टइंडीज, कोलकाता, 2013
113 रन विरुद्ध वेस्टइंडीज, नॉर्थ साउंड, 2016
118 रन विरुद्ध वेस्टइंडीज, सेंट लूसिया, 2016
106 रन विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021
113 रन विरुद्ध बांग्लादेश, चेन्नई, 2024

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 18-12-2024