Breaking : शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. संसदभवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आमच्यात चर्चा झाली, त्याव्यतिरिक्त आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 18-12-2024