रत्नागिरी : विधानसभेच्या कामकाजासाठी तालिका अध्यक्ष म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनाले, दिलीप सोपल यांच्यासह तसेच चिपळूण- संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राजापूरचे तत्कालीन आ. राजन साळवी यांना देखील तालिका सभाध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षपदी सभागृहातील चार सदस्यांची निवड केली आहे. त्यामध्ये चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांचादेखील समावेश आहे. शेखर निकम यांना तालिका सभापतिपदाचा मान मिळाल्याने त्यांचे चिपळूण, संगमेश्वरमधून अभिनंदन केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 18/Dec/2024














