राजापूर : यंदा राजापूर तालुक्यात भातशेती चांगली झाली आहे. त्यावर कीडरोगाचाही प्रादुर्भावही होता; परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यात शेतकऱ्याला यश आले; मात्र परतीच्या पावसाने भातशेतीला मोठा तडाखा बसला. त्यामध्ये तालुक्यातील ४२ गावांमधील २४० शेतकऱ्यांचे २२.०३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तसेच विविध कारणांमुळे भातशेतीचे उत्पादन घटल्यामुळे वर्षभरातील धान्याची बेगमी करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.
कीडरोग आणि निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव होऊनही यावर्षी चांगले उत्पादन आले होते; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. परतीच्या पावसाने नुकसान झाले तसेच आडव्या पडलेल्या रोपांना नव्याने फुटवे आले. त्यामुळे यंदा उत्पादन घटले आहे. परतीच्या पावसात भातशेतीसह अन्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाकडून सर्व्हेक्षण आणि पंचनामे करण्यात आले. त्यात तालुक्यातील ४८ गावांमधील २२.३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
परतीच्या पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागातर्फे सर्व्हेक्षण आणि पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. अनिल गावित, तालुका कृषी अधिकारी, राजापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 18/Dec/2024














