चिपळूण : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गोविंदराव निकम विद्यालयाचे यश

सावर्डे : येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सात विभागापैकी पाच विभागांमध्ये यश संपादन केले. दोन विभागांची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद रानागिरी, पंचायत समिती चिपळूण व सह्याद्री शिक्षणसंस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आसुर्डे-आंबतखोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ५२व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून ४६ शाळांनी सहभाग नोंदवलेला होता. त्यामध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थी वैज्ञानिक प्रतिकृती प्राथमिक गट सहावी ते आठवी गटातून ओम तेटांबे व विपुल सुर्वे या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्मार्ट एनर्जी सेकिंग अॅन्ड वॉटरिंग सिस्टिम या प्रतिकृतीने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. दिव्यांग विद्यार्थी वैज्ञानिक प्रतिकृती नववी ते बारावी गटातून सानिका तांदळे या विद्यार्थिनीने स्मार्ट कार कंट्रोलर या प्रतिकृतीची मांडणी केली होती. या प्रतिकृतीने सर्व तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. ही प्रतिकृती चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे. नववी ते बारावी प्रश्नमंजुषा गटात शौर्य टाकळे व श्रेया राहे यांनी सहभाग घेतला होता.

या विभागत विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. वैज्ञानिक प्रतिकृती प्रयोगशाळा सहायक व परिचर या विभागातून संतोष मेस्त्री यांनी मूलद्रव्याची माहिती ही प्रतिकृती मांडली होती. या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. हे विद्यार्थी वैज्ञानिक प्रतिकृती माध्यमिक नववी ते बारावी या गटातून मांडलेल्या स्वयंचलित पादचारी फूल या प्रतिकृतीने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सिद्धांत दरडे प्रार्थना गावंणाग या विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती बनवली होती.

या प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे अध्यक्ष व ज्येठ विश्वस्त शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 18/Dec/2024