चिपळूण : येथील चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य राघव खर्चे यांनी सह्याद्री रँडोनिअरतर्फे आयोजित स्पर्धा पूर्ण केली. त्यांनी पाटण अतीत किणी टोलनाका परत पाटण अशी २०० किमी बीआरएम स्पर्धा १० तास ८ मिनिटांत पूर्ण करून सुपर रँडोनिअर हा किताब पटकावला आहे.
एकाच कॅलेंडर वर्षात २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी, ६०० किमी अंतराच्या बीआरएम पूर्ण केल्यानंतर सुपर रँडोनिअर हा किताब मिळतो खर्चे यांनी भोपाळ येथे शिक्षण पूर्ण करताना सायकलिंगचा छंद जोपासला आहे. मुद्दाम वेळ काढून सारमार्ग सायकलिंगचा छंद ते पूर्ण करत आहेत. डीबीजे महाविद्यालयाच्या प्रा. खर्चे यांचा राघव हा मुलगा आहे. राघवच्या
या यशाबद्दल अनिल खर्चे व सोनाली खर्चे यांनी आनंद व्यक्त केला. गतवर्षी या किताबासाठी प्रयत्न करत असतानाच राघव यांना अपघात झाला. त्यातून सावरून पुन्हा प्रयत्न करत असतानाच शैक्षणिक कारणाने त्यात खंड पडला. तरीही यावर्षी नव्याने प्रयत्न करून राघवने हा किताब प्राप्त केला आहे.
सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्याची गुरुकिल्ली मिळाली आहे. यापुढे १०००, १२०० किमी बीआरएमचे टप्पे खुणावत आहेत. राघव खर्चे, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 18/Dec/2024














