लांजा : आदर्श पिढी घडविण्यासाठी चांगले संस्कार होणे आवश्यक आहे आणि हे चांगले संस्कार करण्याचे काम चांगली पुस्तके करतात. म्हणूनच आजच्या पिढीने साने गुरुजी यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक शशिकांत जाधव यांनी लांजा येथे केले.
लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पूज्य साने गुरुजी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा शहरातील एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूल लांजा येथे पार पडल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शशिकांत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा राणे, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव एम. ए. सय्यद, विद्या समिती सचिव जे. के. कांबळे आदींसह तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, महेश पाटकर, संदेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात वृंदा कोतापकर हिने प्रथम क्रमांक तर राजवीर जाधव याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
वक्तृत्व स्पर्धेत मुजीबा लांबे हिने प्रथम क्रमांक, प्राची नाटेकर हिने द्वितीय क्रमांक तर स्नेहल करळकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 18/Dec/2024














