रत्नागिरी : शहरानजीकच्या किल्ला येथील लाईट हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वा. सुमारास करण्यात आली. मुसद जाकीर वाडकर (२९), आझाद मुस्लिम चौधरी (२८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही त्या ठिकाणी आपल्या समोर दारूची बाटली आणि ग्लास घेऊन बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 18/Dec/2024














