मुंबई विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात वरुण वारसेची निवड

रत्नागिरी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वरुण वारसे (प्रथम वर्ष कला) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. वरुण याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. कल्पेश बोटके, मिनार कुरटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 18/Dec/2024