रत्नागिरी : फणसोप मराठी केंद्राच्या हिवाळी स्पर्धा भाट्ये येथे उत्साहात संपन्न झाल्या. सदर क्रीडास्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा गोळप शिरंबाड ने घवघवीत यश संपादन करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
लहान गट मुलगे सांघिक कबड्डी व खो खो विजेता लहान गट मुली सांघिक कबड्डी, खो खो व लंगडी विजेता त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धेत थाळी फेक – सिद्धेश घाणेकर -प्रथम ,समर्थ थुळ -द्वितीय,गोळा फेक -अर्णव घाणेकर – प्रथम,धावणे – सिद्धेश घाणेकर – प्रथम
मुली वैयक्तिक उंच उडी- संध्या शर्मा – प्रथम,शगुन गुप्ता – द्वितीय , धावणे- स्वरा घाणेकर- तृतीय, थाळीफेक -संध्या शर्मा – तृतीय
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री रवींद्र आग्रे सर, सरपंच व उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत गोळप, मुख्याध्यापक श्रीम दिपश्री भांडवले मॅडम, उपशिक्षक श्रीम हेळेकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले व बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 19/Dec/2024














