चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा आयफोन चोरीस गेल्याची घटना घडली. यामध्ये तिचे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ऐश्वर्या जगदीश सावंत (रा. वाशी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही घटना १६ डिसेंबर रोजी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या फलाट नं. २ वर घडली. ऐश्वर्या सावंत या चिपळूण ते मुंबई मार्गावर तुतारी एक्स्प्रेसने जाण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकात फलाट क्र. २ वर थांबल्या होत्या. यावेळी तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी होती. जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेले ब्राऊन रंगाचे पाकीट व डाव्या खिशात ठेवलेला मोबाईल अज्ञाताने चोरला. यामध्ये ५५ हजार रूपये किंमतीचा अॅपल कंपनीचा आयफोन व पाच हजार रूपये रोख रक्कम चोरीस गेली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 19/Dec/2024