इच्छुक उमेदवारांनी आज संपर्क साधण्याचे आवाहन
चिपळूण : ‘डी’ अमिको इशिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत जहाजावर काम करण्याची संधी कोकणातील तरूणांना उपलब्ध झाली आहे. यासाठी नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरूवार दि. १९ रोजी डी’ अमिको इशिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या चिपळूण येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘डी’ अमिको इशिमा ग्रुप, ऑइल, केमिकल आणि बल्क करिअर ग्रुप वाढवण्यासाठी चिपळूणमध्ये या मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे. कुशल आणि उत्साही असणाऱ्या नाविकाला बोर्डात प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑइलर, केमिकल टँकर आणि बल्क करिअरवर कामासाठी बोसन, इंजिन फिटर, सक्षम सीमन, चीफ कूक, पंपमन, ऑइलर अशी विविध पदांची भरती केली जाणार आहे. तसेच या जहाजात अनेक सोयी असून यामध्ये ऑनबोर्डसाठी इंटरनेट प्रवेश, चांगल्या पदोन्नतीची शक्यता, भारतीय पाककृती खानपान, त्वरित सामील होणे आणि वेळेवर आराम, ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्वात लहान ताफा डी ‘अमिको समूहासोबत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक नाविकांनी नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडियाच्या चिपळूण येथील साठे संकुल, एसएमएस हॉस्पिटल बिल्डिंग, पहिला मजला (बुरुमतळी) येथे १९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा. पर्यंत नावनोंदणी करावी किंवा कमलेश सोळंकी, भास्कर सोगम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नॅशनल युनियन सिफेअर्स ऑफ इंडिया यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 19/Dec/2024
