रत्नागिरी : तारण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये अनधिकृपणे प्रवेश करुन बँकेने लावलेले सील व कुलूप तोडल्याप्रकरणी दाम्पत्यासह अन्य चार जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास कारवांचीवाडी आदर्श वसाहत येथे घडली आहे.
स्नेहल सुनील साळवी आणि त्यांची पत्नी (दोन्ही रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) व अन्य चार अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बँकेचे कर्मचारी रोहन राजीव पै (४३, रा. मुंबई) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, त्यांच्या बँकेचे ग्राहक मे. परेश फार्मासिटिकल डिस्ट्रीब्युटस या संस्थेच्या भागीदारांनी गहाणदार/जामिनदार सुनील विश्वनाथ साळवी यांनी बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता तहसीलदार रत्नागिरी यांनी ताबा घेउन ती फिर्यादींकडे दिलेली होती. या मालमत्तेच्या देखरेखीसाठी बँकेकडून दोन सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास स्नेहल सावळी त्याची पत्नीसह इतर चार अज्ञातांनी त्या जागेत अनाधिकाराने प्रवेश करीत इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या कुलुपास बँकेने लावलेले सील व कुलूप तोडले. तेव्हा तेथील दोन गार्डनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 19/Dec/2024












