रत्नागिरी-संगमेश्वर रस्त्यावरील किमान खड्डे तरी बुजवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर-रत्नागिरी हा टप्पा अत्यंत खडतर ठरला आहे. मागील सुमारे १४ वर्षे या महामार्गाचे काम सुरू असूनही अजूनही हा टप्पा पूर्णत्वास जाताना दिसत नाही.

रत्नागिरीतून संगमेश्वर कडे जाताना वाहनचालक उक्षी मार्ग जाणे अधिक पसंत करतात. सध्या संगमेश्वर रत्नागिरी रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. रस्ता केव्हा करायचा आहे तेव्हा करा, मात्र तोपर्यंत किमान खड्डे तरी बुजवा, अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.

प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत या मार्गावर डागडुजी करण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 19-12-2024