खेड : तालुक्यातील वेरळ खोपी मार्गावर दि. २ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरळ ते खोपी असा प्रवास करत असताना खोपीवरून वेरळच्या दिशेने येणारी मारुती सुझुकी इटिंगा गाडीने होंडा अॅक्टिव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा अॅक्टिव्हा चालक सागर घनशाम खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. इटिंगा गाडीचा चालक राजू भागोजी केदारी हा अपघात करून पळून गेला. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 19/Dec/2024












