खेडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

खेड : तालुक्यातील भरणेनाका मोरे चिकन सेंटर समोर दि. १६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मटका जुगार खेळण्याच्या गुन्ह्यात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी उमेश पाडुरंग ताब (वय ४०) हा मटका जुगार खेळवत असताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांनी त्याच्याकडून काही रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 19/Dec/2024