रत्नागिरी : जयगड समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह सात दिवसांनी सापडला

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील समुद्रात मच्छिमारी बोटीवरुन पडून बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी आढळून आला.

राम शिवा डंगोरी (वय ४१, मुळ रा. कैलाली नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी राम डंगोरी हा मिरकरवाडा येथील मच्छिमारी बोटीवरुन मच्छिमारी करण्यासाठी जयगड येथे गेला होता. त्यावेळी समुद्रात त्याचा तोल गेल्याने पडला आणि बेपत्ता झाला होता. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर त्याच्या सहकाऱ्यांनी दिली होती.

दरम्यान, मंगळवार १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. सुमारास बेपत्ता झालेल्या डंगोरीचा मृतदेह जयगड येथील समुद्रात मिळून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 19/Dec/2024