चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस.टी. बस दाभीळ नाका (लवेल) व लोटेमाळ (घाणेखुंट) येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अंकुश काते यांनी केली आहे.
या मार्गावरील अनेक एस.टी. वाहकांच्या तिकीट मशिनमध्ये दाभीळ नाका व लोटेमाळ हे अधिकृत थांबे नसल्याने वाहक प्रवासी चढ-उतार करीत नाहीत. कोकणातील सर्वात मोठी औद्यागिक वसाहत दाभीळ नाका व लोटेमाळ या थांबांच्या दरम्यान वसलेली आहे. तसेच परशुराम हॉस्पिटल, परशुराम आयुर्वेदिक महाविद्यालय व घरडा इंजिनिअरिंग कॉलेज या परिसरात आहे. यामुळे या परिसरात दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी मुंबई, भिवंडी, कल्याण, ठाणे, रोहा, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर, धाराशिव, अक्कलकोट येथून येत असतात. दाभीळ नाका, लोटेमाळ हे मुंबई-गोवा महामार्गावरील जुने प्रवासी थांबे आहेत. खेड ते चिपळूण दरम्यान असलेल्या दाभीळ नाका, लोटेमाळ या थांब्यावर लांब पल्ल्याच्या एस.टी. बस थांबवाव्यात, अशी मागणी काते यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 19/Dec/2024












