रत्नागिरी : चिपळूणात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

आरवली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. आ. शेखर निकम यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पसंख्याक विभागाचे राज्य अध्यक्ष आ. इद्रिस नायकवडी यांच्या सूचनेनुसार अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. आ. शेखर निकम, जिल्हा अध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ कार्यकर्ते जमालुद्दीन बंदरकर यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांचे हस्ते भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी मान्यवरांचे पुष्प देत स्वागत केले. मुंढेचे सरपंच मयूर खेतले यांनी मनोगत व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वहाव सुर्वे, इमाम शहा, डॉ. शमिना परकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माजी सरपंच अमजद काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी साहिल आरेकर, नूर बिजले, कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे, स्वाती हडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 19/Dec/2024