गुहागर : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयामधील चार प्राध्यापकांना येथील काही संस्थाचालक आणि त्यांनी सोबत घेऊन आलेल्या चार ते पाच गुंडांनी जबर मारहाण केली आहे. यामध्ये चार प्राध्यापक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांमध्ये संस्था अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदीप भोसले आणि त्यांच्यासोबत आलेल्यांपैकी रोहन भोसले आणि अन्य गुंडांचा समावेश आहे.
ही घटना बुधवार, दि. १८ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान कॉलेजच्या आवारातच घडली. महाविद्यालयाची विद्यापीठामध्ये तक्रार केल्याच्या संशयावरून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये प्रा. गोविंद भास्करराव सानप (वय ३७), प्रा. अनिल शशिकांत हिरगॉड (३७), प्रा. निळकंठ सखाराम भालेराव (३९), प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव (३९) यांचा समावेश आहे.
जखमींना गुहागर येथील शासकीय मेडिकलसाठी नेले होते. दोन प्राध्यापकांना जबर मारहाण झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यास सांगितले आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुहागर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्राध्यापक संघटना एकवटली असून त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 19-12-2024












