कडवई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्यभरामध्ये अत्याधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई या अल्पसंख्याक उर्दू हायस्कूलने सहभाग घेतला. प्रशालेने गुणवत्तेच्या सर्व टप्प्यांवर यशस्वी ठरत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
सन १९६२ सालात कडवई मोहल्ल्यातील काही मुस्लिम बांधवांनी ही शाळा उभारली. ग्रामीण भागातील शाळा असताना देखील शैक्षणिक गुणवत्तेबरोबर जगाच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी कुठेच मागे पडणार नाहीत यासाठी अनेक उपक्रम विद्यालयामध्ये सुरू करण्यात आले. एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे, मुख्याध्यापक रिजवान कारिगर, मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांचे यासाठी मोलाचे योगदान लाभले. या यशाबद्दल प्रशालेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 19/Dec/2024












