पावस : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दि.१५ रोजी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड आणि चिपळूण जवळील गोविंदगड (गोवळकोट) या ठिकाणी ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील प्रशिक्षण वर्गातील ३४ धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.
पूर्णगड किल्ल्यावर वीर हनुमंताच्या चरणी सामूहिक प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ झाला. कान्होजी आंग्रे यांचे स्मरण करून सचिंद्र चादरकर यांनी त्यांच्या विषयी माहिती सांगितली. प्रकाश कोंडस्कर यांनी मार्गदर्शन केले.
चिपळूण जवळच्या गोवळकोट (गोविंदगड) येथील ग्रामदेवता श्री करंजेश्वरी देवीला श्रीफळ अर्पण करून आणि सामूहिक प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ झाला. सर्व उपस्थित धर्मप्रेमींनी गडावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. समितीचे कौस्तुभ तांबिटकर व ओंकार जरळी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना धर्मावरील आघात व हिंदुराष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. सर्व धर्मप्रेमींनी हिंदुराष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. राजे सामाजिक प्रतिष्ठानचे विशाल राऊत यांनी गोवळकोट येथे युवती शौर्य जागृतीवर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
स्व-संरक्षणाची प्रात्यक्षिके
चिपळूण येथे राजे सामाजिक प्रतिष्ठानचे विराज चव्हाण यांनी गोविंदगडाची माहिती सांगितली. तसेच विशाल राऊत यांनी गडाचा इतिहास सांगितला. गडावर स्व- संरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थित धर्मप्रेमींनी श्रीरामाचा सामूहिक जप केला. तसेच गडावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 19/Dec/2024












