वाहन चालवताना बेशुद्ध पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : गाडी चालवताना अचानकपणे स्टेअरिंगवर बेशुध्द पडलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.५० वा. सुमारास घडली.

अमरजीत शहाजीराव देशमुख (३८, मुळ रा. भटवाडी, साटवली लांजा सध्या रा. टी. आर. पी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी अमरजीत हा आपली गाडी (एमएच- ०८-एजी-६११६) घेउन मारुती मंदिर ते जे.के. फाईल्स असा जात होता. तो आरोग्यमंदिर येथे आला असता त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो गाडीच्या स्टेअरिंगवर बेशुध्द पडला. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 19/Dec/2024