चिपळूण : पेढे घरवेवाडी येथील तरूणावर कराड येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दीपक ईश्वर पवार (२५, रा. पेढे घरवेवाडी, ता. चिपळूण) असे त्याचे नाव आहे.
दीपक याचा दि. २० नोव्हेंबर रोजी फरशी नाका येथे मोटारसायकल घसरून अपघात झाला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला कराड येथे हलविण्यात आले. दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी त्याचा उपचारादरम्यान तेथे मृत्यू झाला. या बाबत चिपळूण पोलिस ठाण्यात दि. १६ डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 19/Dec/2024












