चिपळूण : वालावलकर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागास सोलरद्वारे वीजपुरवठा

सावर्डे : डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टने वालावलकर रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सौरऊर्जेने प्रकाशित केला आहे. त्यामुळे या विभागातील सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, रेडिएशन युनिट्स, बाह्यरुग्ण ओपीडी परिक्षणाचे काम सुलभ होणार आहे.

येथील संस्थेच्या सामाजिक कार्याचा उद्देश जाणून लेग्रांड इंडिया लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेऊन १०० किलो वॅट एवढी ऊर्जा निर्माण होईल, अशी सौरपॅनल देणगी म्हणून दिली.

अवेस्ता सोलरचे मालक बर्गिस बलसारा यांच्या संपूर्ण सहकायनि ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त हरित संकुलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण इमारतीला सौरपॅनेल बसवण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी संस्थाचालक विकास वालावलकर उपस्थित होते. सौरऊर्जेचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम कोकणात प्रथमच होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 19/Dec/2024