रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक सरस्वती विद्यामंदिर खानू नं. १ या शाळेने परसबाग स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. हा उपक्रम प्रधानमंत्री पोषण आहारांतर्गत खानू शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी राबवला आहे. परसबाग स्पर्धेसाठी मुलांनी स्वतः जमीन खणून मळे तयार केले. त्यामध्ये टोमॅटो, कोबी, मिरची, वांगी, वाल या फळभाज्यांची रोपे लावली. या रोपांची काळजी मुले घेतात. त्यांना खतपाणी घालतात, कीटकनाशके फवारतात, शेतीविषयक सर्व कामे विद्यार्थी करतात.
या परसबागेच्या माध्यमातून मुलांना शेतीची आवड निर्माण झाली. या फळभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला कोणती जीवनसत्त्वे मिळतात त्यांचे महत्त्व जाणून घेतात. रोजच्या पोषण आहारात भाज्यांचा समावेश असतो. या परसबागेची पाहणी विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांनी केली.
तसेच गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी या परसबागेला भेट दिली. परसबाग तयार करण्यासाठी संजय शेलार यांनी मुलांना रोपे आणून दिली तसेच या परसबागेसाठी मुख्याध्यापक स्मिता जाधव, पदवीधर शिक्षक दरडी, कामेरकर व शामल नागले तसेच केंद्रप्रमुख तारवे यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 19/Dec/2024












