रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे २२ ला क्रॉसकंट्री जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ अमरावती येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
ही स्पर्धा डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकूल येथे सकाळी ९ वा. सुरू होणार आहे. स्पर्धेत पुरुष व महिला (१० किमी.), २० वर्षांखालील मुले (८ किमी.) व मुली (६ किमी.), १८ वर्षांखालील मुले (६ किमी.) व मुली (४ किमी.), १६ वर्षांखालील मुले (२ किमी.) व मुली (२ किमी.) या गटात आयोजित केली आहे. राज्य स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघ प्रत्येकी सहाजणांचा तर १८ आणि १६ वर्षे वयोगटासाठी प्रत्येकी दोनजणांचा संघ सहभागी होणार आहे.
२० वर्षांखालील गटात १३ जानेवारी २००५ ते १२ जानेवारी २००७, १८ वर्षांखालील गटात १३ जानेवारी २००७ ते १२ जानेवारी २००९ तर १६ वर्षाखालील गटात १३ जानेवारी २००९ ते १२ जानेवारी २०११ या कालावधीत जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा युआयडी नंबर असणे आवश्यक आहे. खेळाडूंना आपली प्रवेशिका या २० पर्यंत नोंदवता येतील. प्रथम तीन क्रमांकांच्या खेळाडूंना प्रावीण्य प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 19/Dec/2024












