रत्नागिरी : मागील महिन्याभरात वातावरणामध्ये चढ-उतार राहिल्यामुळे त्याचा परिणाम हापूसवर मोठ्या प्रमाणात झाले. सुरुवातीला सलग आठ दिवस कडाक्याची थंडी, त्यानंतर आठ दिवस ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाची हजेरी अशी स्थिती. मात्र, गेल्या आठ दिवसांत पारा खाली येऊ लागल्यामुळे सर्वत्र थंडी पडू लागली आहे. हे वातावरण हापूसला पोषक असून मोहोराला फळधारणा होऊ लागली आहे. कणीपासून सुपारीएवढी कैरी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बागायतदारांना तुडतुडा, किडींसह थ्रिप्सच्या प्रादुर्भावापासून ही लागवड सुरक्षित ठेवावी लागणार आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीतच रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसच्या पेट्या बाजारात जाण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा डिसेंबर संपत आला तरीही ६० टक्क्यांहून अधिक बागांमध्ये मोठ्याप्रमाणात मोहोर आलेला आहे. हा मोहोर पुढील काही दिवसांत जून होऊन त्याला फळधारणा होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागेल. या वेळेत मोहोरावर पडणाऱ्या तुडतुड्यापासून आंबा बागा जपण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे. त्यादृष्टीने हवामानातील बदल प्रत्येक बागायतदाराला टिपावे लागणार आहेत. फवारण्यांचे वेळापत्रक, बागांची सफाई, सुकलेला मोहोर पाडून टाकणे किंवा कीड-मुंग्यांपासून मोहोर सुरक्षित ठेवणे या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.
दापोलीत रविवारी किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदल गेले आहे. शनिवारीही पारा १०.८ अंश इतका होता. मागील चार दिवसांत कमी अधिक नोंद आहे. पारा १४ अंशांपर्यंत स्थिर राहिल्यामुळे दापोलीत थंडीचा जोर जाणवत आहे. उर्वरित तालुक्यातही गेले दोन दिवस थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोटी पेट लालेल्या आहेत. मात्र, थंडीच्या दिवसातही गावोगावी दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना गदीं पाहायला मिळत आहे.
मोहोर येण्याचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे फळधारणेनंतर आंबा बागांमधील व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागणार आहे. ते गांभीर्यांने केले तर त्याचा फायदा हंगामात होईल. यावर्षी मार्चअखेरीस हंगाम चांगला राहील. फेब्रुवारीला आंबा खाण्याची सवय यंदा मोडणार आहे. – सलील दामले, गोळप, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 19/Dec/2024












