रत्नाागिरी : परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस संयोजित व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी प्रशाला आयोजित परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त पायी बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या बालदिंडीमध्ये शाळेतील बाल वारकरी सहभागी झाले होते.
या सोहळ्याच्या उद्घाटन समारंभासाठी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बालदिंडी सोहळा गाडीतळ मैदान ते अध्यात्म मंदिरापर्यंत उत्साहात झाला. दिंडीमध्ये बाल वारकरी गजर, अभंग, रिंगण, फुगड्या आणि स्वामींचा जयजयकार करण्यात मग्न झाले होते.
या वर्षी सेवा मंडळ पावसतर्फे विशेष वेशभूषा, रंगभूषा स्पर्धा झाल्या. बाल वारकऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ अध्यात्म मंदिर येथे झाला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना तारी यांनी केले, तर आभार संयोजकांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 20/Dec/2024












