विठ्ठल मंदिरात आज संत गाडगेबाबा पुण्यतिथी

रत्नागिरी : रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता जिल्हा परीट समाज सेवा संघाच्यावतीने संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी उत्सव विविध उपक्रमाने साजरी होणार आहे.

संत गाडगेबाबा नगरात स्वच्छता अभियानही राबवण्यात येणार आहे. यावेळी संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन, आरती आणि त्यानंतर दुपारी ११ ते १२ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी एक वाजता खिचडी प्रसाद वाटप करण्यात येईल. ३ ते ५ परीट समाजबांधवांच्या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. ५ ते ७ या वेळेत सतीशबुवा पांचाळ यांच्या भजनानंतर रात्री ८ वा. धुपारतीने कार्यक्रमाची सांगता होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 20-12-2024