लांजा : तालुक्यातील शिरवली-देऊळवाडी व मोर्येवाडी येथील श्री जांगलदेव मंदिराचा जीर्णोद्धार, जत्रोत्सव असा संयुक्त कार्यक्रम २० आणि २१ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. श्री जांगलदेव सेवा संप्रदाय मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवांतर्गत २० डिसेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत श्री श्री जांगलदेव जांगलदेव मंदिर कलशारोहण, होमहवन, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायं. ८ वा. हभप अनिलबुवा राजापकर यांचे भजन. २१ रोजी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी २ ते ३ महाप्रसाद होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 20/Dec/2024












