खेड : कोकण रेल्वे मार्गावर दि. १८ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कोंडीवली गावानजीक रेल्वे रुळावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्याचे वय सुमारे २५ ते ३० वर्षे असून, त्याचा मृत्यू नेत्रावती एक्स्प्रेस गाडीची धडक बसून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती अंजनी रेल्वे स्टेशन मास्तर प्रसन्न दाभोळकर यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठवला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 20/Dec/2024














