रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील मांडवी बिच ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वा. करण्यात आली. साहिल संदेश रायकर (२३, रा. आगवे, लांजा) आणि तेजस संतोश रायकर (३१, रा. आगवे, लांजा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 20/Dec/2024