रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे नळ कारागीर व्यवसायाचे नुतनीकरण केलेल्या लॅबचे उद्घाटन बुधवारी संपन्न झाले. पीडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड व आय.एम.सी.ऑफ आय टी आय संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेतील नळ कारागीर व्यवसायाच्या लॅबचे नुतनीकरण करण्यात आले.
यावेळी पीडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेडचे अरुणजी उपाध्याय, डेप्युटी मॅनेजर स्कील डेव्हलपमेंट इनिसिएटीव्ह योगेश पाटील, स्कील सुपरवायझर राहुल कडे, आय एम सी ऑफ आय टी आय संगमेश्वरचे चेअरमन वैभव संसारे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शशिकांत कोतवडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य, सर्व कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 20-12-2024









