चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेले वाढीव घरपट्टी आंदोलनप्रसंगी शिष्टमंडळाला मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तोंडी आश्वासन दिले होते. त्यानुसार आंदोलन स्थगित केले होते. आपली मागणी होती की ही घरपट्टी चुकीची लादली आहे. ती पूर्णतः कमी होणे गरजेचे आहे. त्यानुसार अर्ज करणाऱ्या घर मालकांचे वास्तूचे फेर सर्व्हे व्हावा व तोपर्यंत २ टक्के दंड लावू नये, असे लेखीपण दिले.
त्यानुसार मुख्याधिकारी भोसले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवेदनाची दखल घेत आम्ही केलेली मागणी मान्य करत तसे लेखी पत्र शहर प्रमुख म्हणून आपल्याला दिले आहे. तसेच या फेर सर्व्हेच्या ठिकाणी आपण उपस्थित रहावे व आंदोलनाची भूमिका घेऊ नये असेही नमूद केले आहे. उबाठा सेनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 21/Dec/2024














