शिपिंग क्षेत्रात युवांना मोठी संधी : कॅप्टन मनोज कुमार

चिपळूण : डी अमिको इशिमा इ ही भारतीय सागरी उद्योगातील प्रमुख क्रू मॅनेजमेंट संस्था आहे. जी डी अमिको ग्रुप जहाजांसाठी सर्व क्रू गरजा पूर्ण करते. शिपिंग आणि संबंधित सेवा क्षेत्रात उच्च्च दर्जाची सेवा करीत असल्याने युवांना मोठी संधी आहे, असे कॅप्टन मनोज कुमार यांनी महाभरती नावनोंदणी कार्यक्रमात चिपळूण येथे माहिती देताना सांगितले. चिपळूण येथील नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया यांच्या कार्यालयात गुरुवारी कंपनीच्या वतीने महाभरती नावनोंदणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी कॅप्टन मनोज कुमार, कॅप्टन पंकज नायक, स्नेहा गांधी, सलीम झगडे, कमलेश सोळंकी, भास्कर सोगम, चिपळूण शाखेचे प्रमुख मुबारक जुवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पुढे बोलताना कॅप्टन मनोज म्हणाले की, जगभरातील या कंपनीची १० पेक्षा जास्त कार्यालय असून डी अमिको समूहाकडे जवळपास तीनशे किनारी कर्मचारी आणि तीन हजार अधिक खलाशी जहाजावर काम करत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या लोकांचा व्यावसायिकदृष्ट्या पालन पोषण करणे यावर त्यांचे लक्ष असते. चिपळुणातील नाविकांनी डी अमिको जहाजमध्ये करिअर करावे असे त्यांनी सांगितले. डी अमिको इशिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कॅप्टन पंकज नायक म्हणाले की, ऑबोर्ड इंटरनेट प्रवेश, चांगल्या पदोन्नतीची शक्यता, भारतीय पाककृती खानपान आणि वेळेवर आराम अशा सुविधा कंपनीच्यावतीने उपलब्ध आहेत. त्यामुळे डी अमिको समूहासोबत काम करण्याची संधी गमवू नका, असे आवाहन त्यांनी केले. या महाभरतीत ५० पेक्षा अधिक नाविकांनी नावनोंदणी केली आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना सलीम झगडे यांनी केली. ते म्हणाले, नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडियाने यापूर्वी नाविकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. मुलीना मर्चेंट नेव्हीमध्ये करिअर करता यावे याकरिता प्रशिक्षण घेऊन फॉरेन जहाजावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाविकांना सुट्टीत आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. मुबारक जुवले यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 21/Dec/2024