◼️ उद्योजक दीपक पवार व सौ पूजा पवार यांचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी तालुक्याचे आमदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक दीपक पवार आणि पूजा पवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांचा नेत्र तपासणी आणि दहा लोकांचं मोतीबिंदूचा ऑपरेशन करण्यात येत आहे.
दि २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत शहरातील साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. या मोफत तपासणीचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पूजा पवार यांनी केले आहे.
पहिल्याच दिवशी ३०० लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा सुर्वे, पूजा पवार, कौसल्या शेट्ये काव्य कामतेकर मानसी साळुंखे, दीपक पवार, सौरभ मलूष्टे, विजय खेडेकर, प्रशांत सुर्वे व अन्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 23-12-2024











