छंदोत्सव अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सव 2024 मध्ये दि. 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जिमखाना समितीचे अध्यक्ष व नियामक मंडळाचे सदस्य श्री चंद्रशेखर केळकर व संस्थेचे सचिव श्री सतीशजी शेवडे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी संस्थेचे सहकार्यवाहक प्रा.श्रीकांत दुधगीकर, शालेय समितीचे चेअरमन श्री आनंद देसाई ,संस्थेचे विश्वस्त श्री विद्याधर जोशी संस्थेच्या अजीव मंडळाचे सचिव प्रा. महेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. श्री सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. श्री विद्याधर केळकर, तीनही शाखांचे विभाग प्रमुख प्रा. श्री. वैभव कानिटकर, प्रा. श्री दिलीपकुमार शिंगाडे ,प्रा. सौ .शिल्पा तारगावकर क्रीडा शिक्षक प्रा. सौ. लीना घाडीगावकर व प्रा. श्री. राकेश मालप व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते .

या वर्षीच्या क्रीडास्पर्धा मधील सर्वसाधारण विजेतेपद व सांघिक विजेतेपद विज्ञान शाखेने पटकाविले. फुटबॉल मुले अकरावी विज्ञान शाखा विजेता, तर मुलींमध्ये फुटबॉल स्पर्धेत विजेता अकरावी विज्ञान शाखा ठरली. हॉलीबॉल मुले विजेता बारावी कला व हॉलीबॉल मुली बारावी विज्ञान शाखा विजेता ठरला. क्रिकेट मुले बारावी कला क्रिकेट मुली अकरावी वाणिज्य विजयी ठरला . याबरोबरच कबड्डी मुले बारावी कला व कबड्डी मुली अकरावी वाणिज्य यांनी विजय मिळवला . तसेच रिले (4×100 मीटर) मुलगे बारावी कला व मुलींमध्ये अकरावी कला विजयी संघ ठरला. तसेच रिले(4×100 मीटर) मुले बारावी कला व मुलींमध्ये बारावी कला विजयी ठरला. रस्सीखेच स्पर्धेमध्ये मुलांमध्ये बारावी विज्ञान व रस्सीखेच मुलींमध्ये बारावी विज्ञान शाखेच्या संघाने विजय मिळवला.

वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये कॅरम मुले कु आदित्य गिरीश भिडे व मुलींमध्ये कुमारी निधी संतोष घाडी आणि बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलांमध्ये कु. सौरीष केळकर व मुलीमध्ये कुमारी निर्मिती प्रसन्न सुर्वे हे विजयी झाले तसेच बॅडमिंटन मुले कु. रोमीत संतोष कलगुटकर व बॅडमिंटन मुलींमध्ये चारवी सुरज कापडी विजयी झाले. 100,.200,.800 व 1500 मीटर धावण्यात मुलांमध्ये कला शाखेच्या कु. प्रणव संतोष पावरी या विद्यार्थ्याने चारही स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवला . 100 मीटर धावण्यामध्ये कु. दिव्या दीपक पाल्ये व 200 मीटर धावण्यामध्ये कुमारी वैष्णवी दिलीप तांबे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. 400 मीटर धावणे मुलींमध्ये कुमारी गायत्री विनायक भोसले प्रथम आली व 800 मीटर धावणे मुलींमध्ये कुमारी सायली दिलीप कर्लेकर व1500 मीटर मुलींमध्ये कुमारी वैष्णवी दिलीप तांबे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला.

गोळा फेक स्पर्धेमध्ये मुलांमध्ये वेधस बळीराम शिंदे व मुलींमध्ये तीर्था संदीप मांजरेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लांब उडी स्पर्धेमध्ये कु. अमान संतोष गार्डी व मुलींमध्ये कु. वैष्णवी दिलीप तांबे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 50 मीटर बॅकस्ट्रोक मुले कु. सोहम मंजुळे व 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मुलींमध्ये कस्तुरी दळवी हे प्रथम आले . 50 मी व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मुले कु. सोहम मंजुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व स्पर्धांमधून गोल्डन बॉय कु. प्रणव संतोष पावरी व गोल्डन गर्ल म्हणून कुमारी वैष्णवी दिलीप तांबे या दोन्ही कला शाखेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. या सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन मोठ्या कौतुकाने गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडाशिक्षक प्रा. राकेश मालप यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 23-12-2024