Maharashtra Temperature Today: राज्यातून थंडी गायब! 

Maharashtra Temperature Today: राज्यातून गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. आता अरबी समु्द्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2-3 अंशांनी वाढणार आहे.इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडीचा जोर कमी झाला असून तापमान वाढलंय. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात 17 ते 20 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये 16.4, कोल्हापूर 17.7 अंशांची नोंद झाली. नगरमध्ये 18 अंश सेल्सियस तापमान सोलापूरात 22 अंश एवढं तापमान होतं. मराठवाड्यात बीड, लातूरमध्ये 20 अंश सेल्सियसची नोंद झाली.छत्रपती संभाजीनगरमये 18.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. हिंगोलीत गारठा वाढलेला होता. तिथे 16.5 अंश सेल्सियस तापमान होतं.

राज्यात पुढील 5 दिवस कसं राहणार तापमान?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

पहा कुठे कसं तापमान?

STATIONDATE(YYYY-MM-DD)TEMP MIN (‘C)
AHMEDNAGARAHMEDNAGAR29.8
AHMEDNAGARKOPERGAON27.8
AHMEDNAGARRAHURI31.6
AKOLAAKOLA_AMFU30.6
AURANGABADAURANGABAD30.1
BEEDAMBEJOGAI
BEEDBEED_PTO30.7
BHANDARASAKOLI_KVK29.3
BULDHANABULDHANA_KVK27.6
CHANDRAPURTONDAPUR_AWS40032.5
DHULEDHULE30.7
GONDIAGONDIA
GONDIAGONDIA_AWS40029.7
HINGOLIHINGOLI25.0
HINGOLITONDAPUR_AWS40030.1
JALGAONCHOPDA
JALGAONJALGAON
JALNAJALNA28.1
KOLHAPURKOLHAPUR_AMFU29.2
KOLHAPURRADHANAGRI_ARS27.2
LATURLATUR31.6
LATURUDGIR_AWS40029.6
MUMBAI_CITYMUMBAI_COLABA27.4
MUMBAI_CITYMUMBAI_SANTA_CRUZ29.9
NAGPURNAGPUR_KVK28.4
NAGPURRAMTEK_AWS40030.1
NANDEDNANDED29.8
NANDEDSAGROLI_KVK29.0
NANDURBARNANDURBAR_KVK27.6
NANDURBARNAVAPUR
NANDURBARSHAHADA_AWS40031.9
NASHIKKALWAN28.9
NASHIKVILHOLI28.8
OSMANABADOSMANABAD
OSMANABADTULGA_KVK29.2
PALGHARPALGHAR_AWS40030.4
PARBHANIPARBHANI_AMFU29.0
PUNENIMGIRI_JUNNAR26.5
PUNECAGMO_SHIVAJINAGAR31.9
PUNECHRIST_UNIVERSITY_LAVASA26.5
PUNECME_DAPODI34.8
PUNEINS_SHIVAJI_LONAVALA31.0
PUNEKHUTBAV_DAUND29.6
PUNELONIKALBHOR_HAVELI30.2
PUNENARAYANGOAN_KRISHI_KENDRA28.1
PUNENIASM_BARAMATI29.6
PUNEPASHAN_AWS_LAB29.6
PUNERAJGURUNAGAR31.2
PUNETALEGAON30.7
RAIGADKARJAT29.8
RATNAGIRIRATNAGIRI
RATNAGIRIRATNAGIRI_AWS40029.2
SANGLISANGLI_KVK29.8
SATARAMAHABALESHWAR22.3
SINDHUDURGDEVGAD30.2
SINDHUDURGMULDE_AMFU32.0
SOLAPURMOHOL_KVK32.2
SOLAPURSANGOLA_MAHAVIDYALAYA30.9
SOLAPURSOLAPUR32.7
WARDHAWARDHA29.1
YAVATMALPUSHAD_AWS40028.6
YAVATMALYAVATMAL28.5

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 23-12-2024