रेल्वे प्रवासात ३० हजारांच्या मुद्देमालासह बॅग लांबवली

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची बॅग लांबवून अज्ञाताने ३० हजारांचा मुद्देमाल पळवला. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १.४५ ते २ वा. कालावधीत रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली.

या प्रकरणी पांडुरंग महादेव रांजणकर (४२, रा. कुडाळ, सिधुदुर्ग) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी ते रेल्वेने माणगाव ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना अज्ञाताने त्यांची रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात बॅग चोरून नेली. त्यामध्ये ३० हजार रुपयांचा एक लॅपटॉप व इतर साहित्य होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:40 23-12-2024