दापोली : जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

दापोली : दापोली शहरातील मच्छी मार्केट रिक्षा स्टॅन्ड येथे जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश मोहिते (वय ३३) रिक्षाचालक राहणार वळणे बौद्धवाडी हे मच्छी मार्केट रिक्षा स्टॅन्ड येथे रिक्षा नंबर करिता उभे होते. त्यावेळी सुयोग संजय रेवाळे याने शैलेश मोहिते याच्या उजव्या पायाच्या करंगळीवरून रिक्षा नेल्याने मोहिते याला दुखापत झाली. त्याचा जाब विचारला असता सुयोग रेवाळे, संकेत संजय रेवाळे, संजय रेवाळे सर्व राहणार खेर्डी पांढरीची वाडी यांनी शैलेश मोहिते याला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 23-12-2024