मोडकाआगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे, राज्य सरचिटणीस तथा खेड माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल लक्ष्मण खेडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा सचिव पदी, ( चिपळूण खेड गुहागर मंडणगड दापोली ) तसेच, प्रशांत दत्ताराम आंब्रे यांची उपजिल्हाध्यक्षपदी ( खेड दापोली मंडणगड ) , तर शेखर महाडिक यांची खेड तालुका सचिव पदी, निवड करण्यात आली.
सदर निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी सहसंपर्क अध्यक्ष, मनीष पाथरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उमेश लटके, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुकाध्यक्ष मंगेश चाळके, सैनिक, सागर महाडिक उपस्थित होते.
सदर निवड करतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी सहसंपर्क अध्यक्ष, मनीष पाथरे यांनी शुभेच्छा देऊन पक्ष वाढीसाठी काम जोमाने करा असे आदेश दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 23-12-2024