मंडणगड : मंडणगड येथील बाणकोट रोड येथे महाराष्ट्र शासनाच्या कामगार व इतर कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे.
ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, बांधकाम कामगार, मजूर, रंगारी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, महिला व पुरुषांना या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामीण भागात कुंभारकाम, सुतारकाम, घरबांधणीचे काम करणाऱ्या अनेक महिला व पुरुष मजूर या योजनेमुळे लाभान्वित होणार आहेत. कार्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध लाभांच्या योजनांचा लाभ मिळवण्याकरिता तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगरसेवक सुभाष सापटे व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 23-12-2024