राजापूर : बिबट्याच्या वावरावर कॅमेर्‍यांद्वारे लक्ष

राजापूर : राजापूर शहरातील झरी रोड परिसरात राजापूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे आणि त्यांच्या सहकार्‍यांना दि. 11 डिसेंबर रोजी बिबट्या दिसून आला. याबाबत वन विभागाकडे पाठपुरावा केल्यावर वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले आहेत.

राजापूर शहरात विविध भागांत बिबट्याचा वावर आढळून आल्यावर घबराट पसरली होती. या पार्श्वभूमीवर जमीर खलिफे यांनी राजापूर वन अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून झरी रोड परिसरात कॅमेरा बसविण्याची मागणी केली होती.

या पाठपुराव्यामुळे वन विभागाचे श्री. गुरव यांनी ज्या ठिकाणी बिबट्या दिसून येत आहे, त्या झरी रोड परिसरात सचिन शिंदे यांच्या घराजवळ तसेच कुडाळकर यांच्या घराजवळ असे दोन कॅमेरे आणून बसवले आहेत. यामुळे आता बिबट्याचा संचार कशा पद्धतीने होतोय, हे नेमके समजू शकणार आहे आणि त्यानंतर वन विभागाला योग्य ती कार्यवाही करता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 23-12-2024