बैल आडवा आल्याने अपघात झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : दुचाकीसमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारांदरम्यान कोल्हापूरमध्ये मृत्यू झाला. संजय गणपत गोताड (४५, रा. ओरी सरवेटवाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८-एव्ही ४३३७) वरून पत्नीसह रत्नागिरी ते ओरी असता जात होता. त्यावेळी नरबे गोशाळेच्या अलीकडे त्यांच्या
दुचाकीसमोर अचानकपणे एक बैल आडवा आला. त्यामुळे संजयचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे चाकी तेथील वाळूमिश्रित खडीवरून घसरुन हा अपघात झाला. यात संजय आणि त्याची पत्नी श्रेया ही दोघंही दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले. त्यांना अधिक उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवार १७ डिसेंबर रोजी दुपारी १.१५ वा. संजय तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 23-12-2024