एलटीटी-करमळी विशेष गाडीचे आरक्षण खुले

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमळी दरम्यान सोमवारपासून सुरू होत असलेल्या विशेष गाडीचे आरक्षण दि. २१ डिसेंबरपासून खुले झाले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सोमवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी अशी दैनंदिन विशेष गाडी सुरू होणार आहे. या गाडीचे आरक्षण ऑनलाईन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडकीवर शनिवारपासून सुरू झाले आहे. दि १ जानेवारी २०२५ पर्यंत या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत. ऐन हंगामाच्या काळात रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने कोकण रेल्वे मार्गावर कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 23-12-2024