लांजात होणार नव्याने बैलगाडा संघटनेची स्थापना

लांजा : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा व चिखल नांगरणी स्पर्धा होत आहेत. त्यांना एक संपटितपणा यावा, यासाठी लांजा तालुक्यात बैलगाडा चालकांसाठी नव्याने बैलगाडा संघटनेची स्थापना करण्यात येणार आहे.

लांजा तालुक्यात बैलगाडा संघटना स्थापन होण्यासाठी लांजा तालुक्याचे मुंबईस्थित सुपुत्र युवा समाजिक कार्यकर्ते किरण रेवाळे, पिंट्या मटकर, सारिम वाघू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. नुकतीच एक बैठक तालुक्यातील भांबेड येथे चर्चात्मक इाली. या बैठकीला लांजा तालुक्यातील बैलगाडांचे चाळीस मालक उपस्थित होते. यावेळी बैल, चालक आणि मालक यांना शासकीय योजना, बैलांना लसीकरण, पशु वैद्यकीय, पशु विमा आदी सुविधांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

संघटनेची कार्यकारणी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे लांजा तालुक्यात बैलगाडांचे जे मालक असतील, त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किरण रेवाळे व सहकाऱ्यांनी केले आहे. या बैठकीला लांजा तालुक्यातील बैलगाडा मालक राजन गुरव, सुनील कांबळे, परशुराम रसाळ, जगन्नाथ मटकर, मनीष गुरव, दिनेश जाधव, राजू शिगम, अमोल लांजेकर, मिनेश डोंगरकर, अमोल झोरे, बाबू भालेकर, अमित कानडे, राकेश मुगुटराव आदी आदी बैलगाडांचे मालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 23/Dec/2024