रत्नागिरी : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेची ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी : सन २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी. एच. डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर आहे. तरी या योजनेंतर्गत जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरता परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून दि. १६ डिसेंबरपासून प्रत्यक्षरीत्या व ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 24/Dec/2024