संगमेश्वर : कृषी संकल्प प्राईड शेतकरी कंपनीच्यामार्फत उजगाव सुतारवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील उजगाव सुतारवाडी येथील कृषी संकल्प प्राईड शेतकरी कंपनीच्या संचालिका सुहासिनी पांचाळ यांच्या निवासस्थानी कृषी संकल्प प्राईड शेतकरी कंपनीच्या गटातील शेतकऱ्यांची बैठक आत्मा आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना या विषयावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या योजनेची माहिती देण्यासाठी आत्माच्या अधिकारी यादव उपस्थित होत्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर निविष्ठा निर्मिती, नैसर्गिकरित्या सेंद्रीय शेतीमध्ये रुपांतरण करणे, बीज प्रक्रिया, बायोडायनॅमिक कंपोस्ट, बीजामृत, जीवामृत तयार करणे, दशपर्णी तयार करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. यावेळी संजीवन सावंत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 24/Dec/2024